श्री_साईबाबा_महाविद्यालयात_बी_एस्सी_संगणकशास्त्र_अभ्यासक्रम
#श्री_साईबाबा_महाविद्यालयात_बी_एस्सी_संगणकशास्त्र_अभ्यासक्रम
B.Sc. Computer Science @ Shri Saibaba Senior College Shirdi
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या शैक्षणिक संकुलाच्या श्री साईबाबा महाविद्यालयात बी.एससी. संगणकशास्त्र अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्हणाले, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व विश्वस्त मंडळाने गेल्या वर्षी श्री साईबाबा महाविद्यालय सुरु केलेले आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा असून जुन-२०१९ पासुन नव्याने बी.एससी.संगणकशास्त्र अभ्यासक्रम सुरु करावा यासाठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठामार्फत शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार दिनांक १५ जुन २०१९ च्या शासन निर्णयानुसार संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयात बी.एस.सी. संगणकशास्त्र आणि बी.सी.ए. हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता प्राप्त झालेली आहे. त्याअनुषंगाने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून बी.एससी. संगणकशास्त्र सुरु करण्यात येणार असल्याचे सांगुन या संधीचा शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे ही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्थानच्या श्री साईबाबा महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले आणि प्राचार्य विकास शिवगजे उपस्थित होते.